Lokmat Agro >बाजारहाट > कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव?

कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव?

The sweetness of Kolam and Kalimuch, the taste is heavy and heavy on the pocket! What are the prices of rice? | कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव?

कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव?

परभणी बाजारपेठेत नवीन प्रतीच्या तांदळाची आवक सुरू; खरेदीदारांचा प्रतिसाद

परभणी बाजारपेठेत नवीन प्रतीच्या तांदळाची आवक सुरू; खरेदीदारांचा प्रतिसाद

शेअर :

Join us
Join usNext

नवीन वर्षाला सुरुवात झाली सोबतच काही अन्नधान्याचे दर वाढले. परिणामी, अजूनच महागाईमध्ये भर पडली. यामुळे सामान्यांना आता त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. बाजारपेठेत होलसेल असो की किराणा व्यापाऱ्यांकडे नवीन प्रतीच्या तांदळाची आवक वाढली आहे. नवीन वर्षातील हे तांदळाचे दर सुद्धा काही प्रमाणात वाढले आहेत, परभणीकरांना कोलम आणि कालीमुछ या तांदळाची सर्वाधिक आवड असून चवीला ही भारी असणारा हा तांदूळ नागरिक खरेदी करत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये कधी भाजीपाला महागतो तर कधी दूध, फळे सोबतच अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे दर वाढतात. अशात काही वेळेला मसाले तर कधी ड्रायफ्रूट यांचे सुद्धा दर वाढल्याचे दिसून येते. यामध्ये काही वेळेला विविध साहित्याचे दर कमी होतात, त्याचा कधी दिलासाही मिळतो. मात्र, वर्षातून एकदाच अनेक जण घरासाठी लागणारा तांदूळ, गहू, ज्वारी यांचा साठा करून ठेवतात

१२% वर्षभरात वाढ

तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये दर्जानुसार बाजारपेठेतील हे दर मागील वर्षीपेक्षा किमान दहा ते बारा टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये सध्या किमान क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपये असा फरक पडला आहे. तरी ग्राहकांकडून पसंती ही कोलम आणि कालीमूछ या दोन प्रकारांना दिली जात असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.

असे आहेत तांदळाचे भाव (प्रतिक्विंटल)

कालीमुछ ६४००

कोलम ६२००

एचएमटी ४४००

आंबेमोहर ७८००

इंद्रायणी ४८००

दर वाढल्याने आखडता हात...

बाजारात उन्हाळा, हिवाळा अशा कालावधीत आलेल्या त्या अन्नधान्याची नवीन आवक होताच खरेदी केली जाते. होलसेल बाजारात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन तांदूळ दाखल झाला आहे. या तांदळाचे दर प्रतिक्चेिटल वाढले आहेत. परिणामी, ग्राह‌कांना खरेदी करताना काहीसा हात आखडता घ्यावा लागत आहे. गहू, ज्वारी, तांदूळ अशा प्रकारच्या विविध साहित्याची खरेदी शहरातील शिवाजी चौक, कच्छी बाजार, गुजरी बाजार, जुना मोंढा भागातील होलसेल व्यापायांकडे केली जात आहे.

पाच होलसेल दुकानांवर सर्वाधिक उलाढाल 

शहरामध्ये थेट चंद्रपूर, आंध्र प्रदेश भागातील मिरयालगुडा, गडचिरोली अशा भागातून तांदळाची आवक होते. थेट उत्पादित केलेला 3 माल तेथील व्यापाऱ्यामार्फत परभणी शहरातील किमान पाच होलसेल दुकानदारांकडे विक्रीसाठी उपलब्ध होतो. याशिवाय अन्य 3 किराणा माल विकेले आणि किरकोळ व्यापारी यांच्याकडे सुद्धा या मालाची उपलब्धता असते. होलसेल दुकानांत सर्वाधिक प्रमाणात या तांदळाची विकी होत असल्याची जिह्यातील स्थिती आहे.

शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाची आवक होते. सोबतच ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती ही कोलम आणि कालीमुछ या प्रकाराला दिली जाते. सध्या काही प्रमाणात भाव वाढले आहेत.- अखिलेश सोनी, व्यापारी


ज्वारीचा भाव ५ हजार ५०० हून अधिक

ज्वारीच्या प्रकारामध्ये बार्शी टाकळी ज्वारीचा भाव पाच हजार ५०० रुपये प्रति क्विंटलहून अधिक झाला आहे. नवीन गहू मार्च महिन्यामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे त्याच्या दरातही काही प्रमाणात कमी अधिक वाढ होऊ शकते, अशी स्थिती आहे. मागील वर्षी कालीमूछ, कोलम, एचएमटी, आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळाच्या प्रकारामध्ये असलेल्या दरात किमान २०० ते ४०० रुपयापर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते.

Web Title: The sweetness of Kolam and Kalimuch, the taste is heavy and heavy on the pocket! What are the prices of rice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.