Lokmat Agro >बाजारहाट > तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक

तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक

The temperature is above 40, the water of Pya Shahala is cold, the highest influx is happening here in the state | तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक

तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक

राज्यात सुर्य आग ओकू लागलाय. तापमान वाढत असताना नारळपाण्यासाठी मागणी वाढली आहे.

राज्यात सुर्य आग ओकू लागलाय. तापमान वाढत असताना नारळपाण्यासाठी मागणी वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून उष्ण झळांनी नागरिक कासावीस होत आहेत. यातच थंडगार शहाळ्याच्या पाण्याने शरीराचं तापमान थंड ठेवण्याकडे कल वाढत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहाळ्याची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. 

मागील चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात २७००० ते ३६००० नग शहाळ्यांची आवक होत आहे. यावेळी सर्वसाधारण ३००० ते ३५०० रुपयांचा भाव मिळत असून मागणी वाढली आहे.

राज्यात छत्रपती संभाजीनगरसह पुणे व नाशिकमध्येही शहाळ्यांची आवक वाढली आहे. नाशिकमध्ये साधारण २०० ते ३०० क्विंटल शहाळी रोज येत असून सर्वसाधारण ४५०० रुपये भाव मिळत आहे. तर पुण्यात रोज १२०० ते १३०० क्विंटल शहाळ्यांची आवक होत असून क्विंटलमागे १५०० ते १६०० रुपये भाव मिळत असल्याचे दिसून आले.

Web Title: The temperature is above 40, the water of Pya Shahala is cold, the highest influx is happening here in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.