Join us

देशात आवक वाढली; लासलगाव, पिंपळगाव आणि पुण्यात असे आहेत कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 12:49 PM

आज दिनांक ९ जानेवारी २४ रोजी लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीसह सकाळच्या सत्रातील व्यवहारांत कांदा बाजारभाव काय आहेत? ते जाणून घेऊ यात.

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेल्या साप्ताहिक अहवालानुसार लासलगाव बाजारातील लाल कांद्याच्या किंमती थोड्याफार फरकाने वधारलेल्या दिसत आहेत. या सप्ताहात संपूर्ण देशभरातील कांदा आवक वाढली असून मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्मार्ट प्रकल्पाने नोंदविले आहे.

कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त

आज दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची ८६७० क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव ८०० रुपये असा होता. तर सरासरी भाव १८५० रुपये असा मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याची आज सकाळी १४ हजार ४०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४०० रुपये इतका मिळाला. मनमाड येथे लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजे २०० रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमी बाजारभाव मिळाला.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत ॲग्रो चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

आज (९ जानेवारी २४) सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

छत्रपती संभाजीनगर---91940018001100

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---13161150022001850
खेड-चाकण---250100022001900
लासलगावलाल867080020001850

लासलगाव

- विंचूर

लाल980090020681900
मनमाडलाल600020019211600
पुणे -पिंपरीलोकल2180018001800
पुणे-मोशीलोकल54150015001000
कामठीलोकल16150025002000

पिंपळगाव

बसवंत

पोळ1440040021911800
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी