Join us

लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह या बाजार समित्यांमध्ये मिळतोय क्विंटलमागे एवढा दर..

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 29, 2024 4:19 PM

राज्यात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या खालीच असून लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला आज सर्वसाधारण ४५७८ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. राज्यात आज १६ ...

राज्यात सोयाबीनचेबाजारभाव हमीभावाच्या खालीच असून लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला आज सर्वसाधारण ४५७८ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

 राज्यात आज १६ हजार ३२० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये पिवळ्या सोयाबीनसह लोकल व हायब्रीड जातीचा सोयाबीन बाजारपेठेत शेतकऱ्यांनी आणला होता. त्याला सर्वसाधारण ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. 

मागील महिनाभरापासून सोयाबीनच्या भावात चढउतार होत असून आज  धुळ्यात क्विंटलमागे सोयाबीनला केवळ २०२३ रुपये दर मिळाला. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२५० रुपये भाव मिळाल्याचे पणन विभागाच्या आजच्या बाजारभावांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जाणून घ्या तुमच्या बाजारसमितीत काय मिळतोय सोयाबीनला भाव?

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
29/02/2024
अहमदनगर5440254200
अकोला196441834300
बुलढाणा123040004200
बुलढाणा47041634249
छत्रपती संभाजीनगर142004225
धुळे842854285
हिंगोली110040954290
हिंगोली21840754255
जळगाव1540004195
लातूर768643934578
नागपूर45141004348
नाशिक1142404358
परभणी13543004350
वर्धा7940754250
वाशिम210041004250
यवतमाळ79844504507
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड