Lokmat Agro >बाजारहाट > यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे

यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे

This year the production of 'Kolhapuri jaggery' decreased; Farmers sugarcane to sugarcane factories instead of jaggery production unit | यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे

यंदा 'कोल्हापुरी गुळा'चे उत्पादन घटले; शेतकऱ्यांचा ऊस गुऱ्हाळाऐवजी कारखान्यांकडे

कारखान्यांची एकरकमी प्रतिटन ३२०० रुपयांचा दर आणि त्या पटीत गुळाला मिळणारा दराचा परिणाम यंदा गूळ उत्पादनांवर झाला आहे.

कारखान्यांची एकरकमी प्रतिटन ३२०० रुपयांचा दर आणि त्या पटीत गुळाला मिळणारा दराचा परिणाम यंदा गूळ उत्पादनांवर झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षापेक्षा २०२३-२४ मध्ये गुळाची आवक १० हजार रव्यांनी कमी झाली आहे. कारखान्यांची एकरकमी प्रतिटन ३२०० रुपयांचा दर आणि त्या पटीत गुळाला मिळणारा दराचा परिणाम यंदा गूळ उत्पादनांवर झाला आहे.

कणीदार व चवदार कोल्हापुरी गूळ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. पण, मजुरांची वाणवा, साखर कारखान्यांमधील ऊस दराची चढाओढ आणि गुळाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेला दर यामुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या वर्षाला कमी होत आहे. सध्या जेमतेम दोनशे गुऱ्हाळघरे आहेत.

सात आठ वर्षांपूर्वी समितीत वर्षाला २७ ते ३० लाख गूळ ख्यांची आवक व्हायची. मात्र, ती हळूहळू कमी होत आली आहे. यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. साखर कारखान्यांनी ऊस कमी पडणार म्हणून प्रतिटन ३ हजार ते ३२०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर करून हंगाम सुरू केला.

उसाचे उत्पादन चांगले मिळाल्याने साखर कारखान्यांनी गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले. पण, गुन्हाळघरांच्या चिमण्या लवकर थंड झाल्या. त्यात, गुळाला सरासरी ३६०० रुपये क्विंटलपर्यंत दर राहिला. चार हजार रुपये खर्च करून तयार केलेला एक क्विंटल गूळ ३६०० रुपयांना विक्री करावा लागल्याचा परिणामही आवकेवर दिसतो.

असे आहे गुळाचे गणित
२२० किलो - दोन टन उसापासून तयार गुळाचे उत्पादन
१८०० रुपये - उत्पादन खर्च व वाहतूक खर्च
६,१२० रुपये -  शेतकऱ्यांच्या हातात
६४०० रुपये - दोन टन उसाला कारखान्याकडून मिळणार

तुलनात्मक बाजार समितीतील गुळाची आवक

वर्षआवककिमान दरकमाल दरसरासरी दर
२०२२-२३२१,५२,१७०२७००५१००३८००
२०२३-२४२१,४२,१४९२६५०७५००३६००

सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर मिळाला तर ७,९२० रुपये हातात मिळतील.

गुळाचा उत्पादन खर्चावर दर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना त्यापेक्षा साखर कारखान्यांकडून जादा पैसे मिळत असल्याने मानसिकता बदलली आहे. यंदा दहा हजार रव्यांनी आवक कमी झाली आहे. - के. बी. पाटील (उपसचिव, बाजार समिती)

• मजूर मिळत नसल्याने गुहाळघरांची कमी झालेली संख्या.
• साखर कारखान्यांकडून सर्वोच्च ऊस दर.
• गुळाचा उत्पादन खर्च व मिळणाऱ्या दरातील तफावत.

अधिक वाचा: Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज

Web Title: This year the production of 'Kolhapuri jaggery' decreased; Farmers sugarcane to sugarcane factories instead of jaggery production unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.