Lokmat Agro >बाजारहाट > यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली

यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली

This year, the seven-month long mango season ends How much was the arrival in market? | यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली

यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली

'फळांच्या राजा'चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला.

'फळांच्या राजा'चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला.

शेअर :

Join us
Join usNext

नामदेव मोरे
नवी मुंबई : 'फळांच्या राजा'चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला.

मुंबईकरांनी तब्बल १ लाख २४ हजार ३८ टन आंबा फस्त केला असून, यातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या वर्षीची सर्वाधिक उलाढाल एप्रिल व मे महिन्यांत झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीच्या नियमित हंगामापूर्वी ६ नोव्हेंबरला कोकणातून हापूसची पहिली पेटी दाखल झाली होती. यानंतर काही दिवसांमध्ये मलावी हापूसचीही आवक सुरू झाली होती.

पहिली पेटी लवकर आली असली तरी नियमित आंब्याची आवक फेब्रुवारीपासून सुरू झाली. २०२३ मध्ये फेब्रुवारीमध्ये १८०८ टन आवक झाली होती. २०२४ मध्ये ती २५६६ टनांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक ३८ हजार ७७८ टन आवक झाली होती.

ग्राहकांना ऑगस्ट अखेरपर्यंत आंबा उपलब्ध होता. मुंबई बाजार समितीमध्ये हंगामामध्ये १ लाख २४ हजार ३८ टन आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये कोकणसह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे.

हापूस, पायरी, बदामी, लालबाग, चौसा व इतर सर्व प्रकारचा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील ग्राहकांसह येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही करण्यात आली.

महिनानिहाय आंब्यांची आवक (टनांमध्ये)
फेब्रुवारी - २,५६६
मार्च - १८,११०
एप्रिल - ३,८७,७८७
मे - २८,०४४
जून - १,६६,३१३
जुलै - १,५९,६६३
ऑगस्ट - ३,९४२

या वर्षी हंगाम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरु होता. यामुळे ग्राहकांना आंब्याचा आस्वाद घेता आला. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मलावीमधील आंबा ग्राहकांना उपलब्ध होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट

आंबा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. वाहतूककोंडी व इतर समस्या होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. हंगाम उत्तम पद्धतीने पार पडला. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट

Web Title: This year, the seven-month long mango season ends How much was the arrival in market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.