राज्यातील कामगारांनी बंद पुकारल्यामुळे आज राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. तर पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव पार पडले. या दोनही बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज अकोला आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली होती. येथे अनुक्रमे ३६ आणि ३ हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून अकोला बाजार समितीमध्ये ७ हजार ५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये ७ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
आज राज्यभरातील बाजार समित्या बंद असल्याने केवळ या दोन बाजार समित्यांमध्ये कापसाची खरेदी विक्री झाली असून दोन्ही बाजार समित्यांमध्ये लोकल कापसाची आवक झाली होती.
आजचे कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
26/02/2024 | ||||||
अकोला | लोकल | क्विंटल | 36 | 7000 | 7011 | 7005 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 3000 | 6800 | 7600 | 7350 |