Join us

आज राज्यभरात केवळ दोन बाजार समितीत कापसाचे लिलाव; मिळाला एवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 9:15 PM

आज किती मिळाला कापसाला दर? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील कामगारांनी बंद पुकारल्यामुळे आज राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. तर पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव पार पडले. या दोनही बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, आज अकोला आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली होती. येथे अनुक्रमे ३६ आणि ३ हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून अकोला बाजार समितीमध्ये ७ हजार ५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये ७ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज राज्यभरातील बाजार समित्या बंद असल्याने केवळ या दोन बाजार समित्यांमध्ये कापसाची खरेदी विक्री झाली असून दोन्ही बाजार समित्यांमध्ये लोकल कापसाची आवक झाली होती.

आजचे कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/02/2024
अकोलालोकलक्विंटल36700070117005
देउळगाव राजालोकलक्विंटल3000680076007350
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजारमार्केट यार्ड