नाशिक जिल्ह्यातील विंचूर बाजार समितीत आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी ८ हजार ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. प्रतवारीनुसार किमान 750 ते 2360 रुपये प्रतिक्विंटल भाव उन्हाळी कांद्याला मिळाला. तर गोल्टा खादची सरासरी सतराशे रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली.
लाळ खुरकत रोग आपल्या गोठ्यात आलाय? कसे कराल नियंत्रण
लासलगाव बाजार समितीत एकूण 352 नग उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता. एकूण 5342 क्विंटल कांद्याची आवक झाली असून सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने उन्हाळी कांद्याची विक्री झाली.
पिंपळगाव व सायखेडा या दोन उपबाजार कृषी उत्पन्न बाजारपेठेत अनुक्रमे ६३२ व ३०१ नग उन्हाळी कांद्याची आवक झाली. सरासरी 800 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल या दराने उन्हाळी कांद्याला भाव मिळाला.
मराठा- कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज
विंचूर धान्य बाजारात अशी होती धान्य आवक व विक्री
धान्य | आवक | विक्री |
सोयाबीन | ७८ क्विंटल | ५०१५ |
मुग | २२ गोणी | ११६०० |
गहू | ०५ नग | २५३१ |
मका | ०० | - |