Join us

आज किती मिळाला कांद्याला दर? सविस्तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 5:24 PM

दिवाळीच्या तोंडावर कांद्याची काय परिस्थीती असेल याकडे लक्ष असणार आहे. 

मागच्या एका आठवड्यामध्ये कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता पण त्यानंतर आज कांद्याचे दर पुन्हा काहीसे घसरल्याचं चित्र आहे.  एका आठवड्याचा विचार केला तर दसऱ्यापासून कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत होता. दिवाळीच्या तोंडावर कांद्याची काय परिस्थीती असेल याकडे लक्ष असणार आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने ग्राहकाच्या हितासाठी शेतकऱ्यांची चोहोबाजूने मुस्कटदाबी करण्याचे काम चालवले आहे. पहिल्यांदा कांद्यावरील निर्यातशुल्कात वाढ केल्यामुळे निर्यात थांबून कांद्याचे दर पडले. त्यानंतर केंद्राने निर्यात मुल्यात वाढ केल्यामुळे दर पडल्याचं चित्र आहे. प्रत्येकवेळी केंद्राकडून ग्राहकांचा विचार केला जातो. पण शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च तरी निघेल का याचा विचार केला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. 

सध्या बाजारात लाल, उन्हाळी, पांढरा आणि लोकल कांद्याची आवक होत आहे. आजच्या कांद्याच्या दराचा विचार केला तर कळवण बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे १२ हजार ५०० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. आज ४ हजार ते ६ हजार ५०० एवढा कमाल दर मिळाला आहे. त्या तुलनेत किमान दराचा विचार केला तर ६०० रूपये ते ५ हजार ५०० रूपये दर मिळाला. तर येणाऱ्या आठवड्यात आणि दिवाळीच्या तोंडावर चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जाणून घ्या आजचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/11/2023
कोल्हापूर---क्विंटल1544150050003200
अकोला---क्विंटल650250050004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2709300045003750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7618280048003800
सातारा---क्विंटल270100047002850
धुळेलालक्विंटल118860044003000
जळगावलालक्विंटल415125240002650
धाराशिवलालक्विंटल31300050004000
नागपूरलालक्विंटल1000500060005750
लोणंदलालनग1050150043003000
पुणेलोकलक्विंटल8716250050003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल18230044003350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18250050003750
पुणे-मोशीलोकलक्विंटल661150040002750
कामठीलोकलक्विंटल4450055005000
नागपूरपांढराक्विंटल760550065006250
लासलगावउन्हाळीक्विंटल7568200145964000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6200200045003900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल10000150143403900
कळवणउन्हाळीक्विंटल12500150056004000
मनमाडउन्हाळीक्विंटल2250100040003700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1900150043753600
भुसावळउन्हाळीक्विंटल435004500

4000

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डसोयाबीन