राज्यात आज सांगलीच्या राजापूरी हळदीला बाजारपेठेत चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले. पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सांगलीच्या हळदीला क्विंटलमागे सर्वसाधारण १८ हजार ६०० रुपये भाव मिळाला.
हिंगोलीच्या स्थानिक हळदीला क्विंटलमागे १४ हजार ७४५ रुपयांचा भाव मिळाला. कमीत कमी ११ हजार ४४५ तर जास्तीत जास्त १७ हजार २४५ रुपयांचा भाव मिळाला. शनिवार व रविवारनंतर आज हळदीची आवक केवळ दोन बाजारसमित्यांमध्ये होती.
बाजारपेठेत हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून दिवसेंदिवस हळदीच्या दरात वाढ होत चालली आहे. मागील आठवड्यात १२ हजार रुपये क्विंटल विकली गेलेली हळद या आठवड्यात १७ हजार ८९० रुपये क्विंटल गेल्याने हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.