गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधील आठवडी भाजी बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. बाजारात कांदा, बटाटा, टोमॅटो , भोपळा , कोबी , मिरची या फळभाज्यांसह पालक, मेथी, अळू या पालेभाज्यांची आवक वाढली होती.
आज 18 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील भाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने १० ते २५ रुपये किलोने विक्री होत असून बटाटा ३० - ५० रुपये किलो या दराने विकला जात आहे.
टोमॅटो गडगडला
महिनाभरापूर्वी तेजीत असलेला टोमॅटो आज भाजी बाजारात गडगडला आहे. आज भाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढली होती. परिणामी १० ते २० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे.
कांद्याची स्थिती काय?
बाजार समितीत २००० रुपये क्विंटलने विकला जाणाऱ्या कांद्याला आज भाजी बाजारात २५०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. सर्वसामान्यांना 25 ते 30 रुपये किलोने कांद्याची विक्री बाजारात होत आहे.
इतर फळभाज्यांची काय स्थिती?
भोपळा , कोबी, फुलकोबी , मिरची , बटाटे ,भेंडी या भाज्यांची वाढती मागणी लक्षात घेता किमतींमध्ये २०- ३० रुपये प्रति किलोंची वाढ दिसून येत आहे.
बाजार समितीत भाज्यांचे दर असे होते