Join us

आज तुरीला या बाजारसमितींमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 25, 2024 3:34 PM

जाणून घ्या राज्यातील तूरीचे बाजारभाव, आवक

आज राज्यात तूरीची २४८० क्विंटल आवक होत असून आज बहुतांश ठिकाणी लाल तूरीची आवक झाली. क्विंटलमागे आज सर्वाधिक ११५०० रुपयांचा दर मिळाला.

छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार ५५० रुपयांचा दर मिळत असून  शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

लाल तूरीसह, पांढऱ्या तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये आवक झाली.

नागपूरमध्ये आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ११ हजार २६४ रुपये भाव मिळाला. 

राज्यात बहुतांश बाजारसमितीत तूरीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० ते १२ हजार रुपये भाव सुरु आहे. आज या बाजारसमितींमध्ये तूरीला सर्वाधिक दर मिळाला..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2024
बीडपांढरा5187111080010172
बुलढाणापांढरा5700095009000
छत्रपती संभाजीनगर---10105001068110550
हिंगोलीलाल63106001120010900
जालनालाल2190001064010000
लातूरलोकल100110001200011500
नागपूरलाल121795001185211264
परभणीपांढरा105500100029600
सोलापूरलाल271100001178511000
वाशिमलाल300100001150011000
यवतमाळलाल43298501187511075
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2480
टॅग्स :तूरबाजार