कापसाच्या दराने माना टाकल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तर हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे. कापसाच्या गाठी निर्यात केल्यानंतर हळूहळू कापसाला दर वाढेल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली होती पण दरात जास्त वाढ झाल्याची दिसून येत नाही. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे.
दरम्यान, आज एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये राळेगाव, देऊळगाव राजा, हिंगणघाट, सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली आहे. तर हिंगणघाट येथे उच्चांकी ९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. आज देऊळगाव राजा येथे उच्चांकी ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी दर आहे.
तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत नसल्याने येथील शेतकरी हतबल आहेत.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
20/02/2024 | ||||||
राळेगाव | --- | क्विंटल | 4300 | 6500 | 7220 | 7100 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 788 | 6550 | 6800 | 6725 |
अकोला | लोकल | क्विंटल | 32 | 7000 | 7000 | 7000 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 319 | 6500 | 7040 | 6810 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 1000 | 6500 | 7500 | 7250 |
काटोल | लोकल | क्विंटल | 145 | 6600 | 6900 | 6750 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 138 | 6400 | 7000 | 6700 |
बारामती | मध्यम स्टेपल | क्विंटल | 11 | 6900 | 6900 | 6900 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 9000 | 6000 | 7310 | 6500 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2060 | 6400 | 7020 | 6950 |
फुलंब्री | मध्यम स्टेपल | क्विंटल | 250 | 6650 | 6850 | 6700 |