Join us

Todays Cotton Rates : कापसाचे दरही हमीभावापेक्षा कमीच! जाणून घ्या आजचे सविस्तर दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 9:27 PM

आज राज्यात कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या

कापसाच्या दराने माना टाकल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तर हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे. कापसाच्या गाठी निर्यात केल्यानंतर हळूहळू कापसाला दर वाढेल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली होती पण दरात जास्त वाढ झाल्याची दिसून येत नाही. पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये राळेगाव, देऊळगाव राजा, हिंगणघाट, सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली आहे. तर हिंगणघाट येथे उच्चांकी ९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. आज देऊळगाव राजा येथे उच्चांकी ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी दर आहे. 

तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हिंगणघाट बाजार समितीमध्ये  आज राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापसाची  खरेदी होत नसल्याने येथील शेतकरी हतबल आहेत.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/02/2024
राळेगाव---क्विंटल4300650072207100
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल788655068006725
अकोलालोकलक्विंटल32700070007000
उमरेडलोकलक्विंटल319650070406810
देउळगाव राजालोकलक्विंटल1000650075007250
काटोललोकलक्विंटल145660069006750
हिंगणालोकलक्विंटल138640070006700
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल11690069006900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9000600073106500
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2060640070206950
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल250665068506700
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूसबाजार