Lokmat Agro >बाजारहाट > Todays Cotton Rates : आज कापूस दरात किती झाली सुधारणा?

Todays Cotton Rates : आज कापूस दरात किती झाली सुधारणा?

Todays Cotton Rates: How much has the cotton rate improved today? | Todays Cotton Rates : आज कापूस दरात किती झाली सुधारणा?

Todays Cotton Rates : आज कापूस दरात किती झाली सुधारणा?

जाणून घ्या दिवसभरातील कापसाचे दर

जाणून घ्या दिवसभरातील कापसाचे दर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या दोन महिन्यांपासून कापसाचे दर कोसळले असून अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. तर मागच्या तीन ते चार दिवसांपासून कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याची दिसून येत आहे. तर आज बऱ्याच बाजार समित्यांत ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला असून काही बाजार समित्यांमध्ये २०० ते ५०० रूपयांपर्यंत कमी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज एच-४ - मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली असून हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा-माढेली, वरोरा, देऊळगाव राजा, पारशिवनी, मारेगाव या बाजार समितीमध्ये उच्चांकी कापसाची आवक झाली असून हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

आजच्या दिवसातील उच्चांकी आणि निच्चांकी दराचा विचार केला तर आज नेर परसोपंत आणि हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये ७ हजार ५७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/02/2024
अमरावती---क्विंटल79730074007350
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1552680074007100
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1496680071507000
उमरेडलोकलक्विंटल382680073107100
देउळगाव राजालोकलक्विंटल1000700081007575
वरोरालोकलक्विंटल3077600075016700
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1200635075007000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1584600075006700
नेर परसोपंतलोकलक्विंटल4650065006500
काटोललोकलक्विंटल174660072507000
हिंगणालोकलक्विंटल21650068006800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10000600077856500

Web Title: Todays Cotton Rates: How much has the cotton rate improved today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.