Join us

Todays Cotton Rates : सध्या कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 8:16 PM

राज्यभरातील कापसाला आज किती दर मिळाला यासंदर्भात जाणून घेऊयात.

कापसाच्या दराने यंदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला असून त्यांच्या कापसाला अजूनही दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर सीसीआय आणि पणन महासंघाकडूनही कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू नाही. पण मागच्या दीड ते दोन महिन्याचा विचार केला तर सध्या कापसाच्या दराचा आलेख काहीसा सुधारल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज बाजारात एच.के.एच. ४ - लांब स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, हायब्रीड, मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा, देऊळगाव राजा, परभणी, मारेगाव आणि राळेगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. येथे कापसाला केवळ ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. 

तर आज देऊळगाव राजा येथे आज ७ हजार ३७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी दर होता. तर परभणी बाजार समितीमध्ये त्यापाठोपाठ ७ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2024
अमरावती---क्विंटल94695070507000
राळेगाव---क्विंटल5500665073507200
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल439620070506800
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1270685070506950
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल849655068256700
परभणीहायब्रीडक्विंटल2150700074857350
अकोलालोकलक्विंटल97700071807090
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल155700073067153
उमरेडलोकलक्विंटल529660071606850
देउळगाव राजालोकलक्विंटल2423700076057375
वरोरालोकलक्विंटल3415600071716600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1209620071006700
काटोललोकलक्विंटल165660069006800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10000600073706500
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्ड