Join us

Todays Cotton Rates : कापसाला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 9:06 PM

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

कापसाच्या दराने यावर्षी शेतकऱ्यांची निराशा केली असून कापसाला हमीभावापेक्षा १ हजार रूपयांपर्यंत कमी दर मिळताना दिसत आहे. तर यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल दरात विक्री करावा लागत आहे. मागच्या एका आठवड्यापासून कापसाचे दर वाढण्याची चिन्हे दिसत असून काही बाजार समितीमध्ये आज हमीभावापेक्षा काहीसा जास्त दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज एच-४-मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी-सेलू, पुलगाव, वर्धा आणि देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये पुलगाव बाजार समितीमध्ये ६ हजार ५५० क्विंटल कापूस आला होता. या ठिकाणी ७ हजार १०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. तर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे ७ हजार ३७५ रूपये सरासरी दर मिळाला आहे.

यावल बाजार समितीमध्ये आज ६ हजार ३१० रूपये  प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. आज अकोला, अकोला-बोरगावमंजू, देऊळगावा राजा आणि पुलगाव बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2024
अमरावती---क्विंटल90690070006950
भद्रावती---क्विंटल456660070006800
मौदा---क्विंटल250655068256725
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल696660068256700
अकोलालोकलक्विंटल103700070117006
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल145720074007300
उमरेडलोकलक्विंटल420650070806800
देउळगाव राजालोकलक्विंटल2500660074057375
काटोललोकलक्विंटल175660069006750
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1500650072006850
यावलमध्यम स्टेपलक्विंटल230607066506310
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6550560073007100
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल3000640073506800
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल268667570006850
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड