Join us

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण! पाहा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 6:41 PM

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांकडून सोने चांदीची खरेदी केली जाते.

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांकडून सोने चांदीची खरेदी केली जाते. दिवाळीमध्ये सोन्याच्या खरेदीमागे चांगली सूट मिळत असते तसेच अनेकदा दरवाढ देखील होत असते. आज देशभरातील सोन्या चांदीच्या दरात काहीसी घरसण झाल्याची पाहायला मिळाली. सोन्याच्या प्रती १० ग्रॅम दरामागे १०० रूपये तर चांदीच्या प्रतीकिलोमागे ४२० रूपयांची घरसण झाली आहे. 

झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर

दरम्यान, मागच्या दहा दिवसांपासून देशभरातील सोन्याच्या दरात घसरण होत असून आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५ हजार ९९१ रूपये प्रतिग्रॅमवर तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५ हजार ४९२ रूपयांवर स्थिरावले. तर चांदीचे दर ६९ हजार ८४० रूपये किलोग्रॅमवर स्थिरावले आहेत. काल सोने ६ हजार ५९ रूपये प्रतिग्रॅम तर चांदी ७० हजार २६० रूपये प्रतिकिलो या दराने विक्री केली जात होती. तर आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये अनुक्रमे ०.१७ आणि ०.६० टक्के घसरण झाली आहे. 

मुहूर्ताच्या खरेदीत शेतकऱ्यांचा मालाला किती मिळाला दर? जाणून घ्या

देशभरातील सोन्याचे सरासरी दर जरी ५ हजार ९९१ रूपये प्रतिग्रॅम एवढे असले तरी महाराषट्रातील सोन्याचे दर चढेच आहेत. राज्यातील मुख्य शहरात ५ हजार ५० रूपये प्रतिग्रॅमच्या आसपास दर आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात काहीसी वाढ होत असते पण यंदा सोन्याचे दर स्थिर असल्याचं चित्र बाजारात आहे. 

महाराष्ट्रातील शहरानुसार २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅमचे दर)

  • मुंबई - ६०४९०
  • पुणे - ६०४९०
  • नागपूर - ६०४९०
  • नाशिक - ६०५३०
  • अमरावती - ६०४९०
  • वसई-विरार - ६०५३०
  • छत्रपती संभाजीनगर - ६०४९०
  • भिवंडी - ६०५३०
  • कोल्हापूर - ६०४९०
  • लातूर - ६०५३०
  • ठाणे - ६०४९० 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोनंमहाराष्ट्र