यंदाच्या प्रतिकूल हवामानातही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने अर्ली किंवा आगाप द्राक्ष पिकवले असून नुकताच नाशिकहून एक कंटेनर रशियाला निर्यात झाला आहे. सध्या स्थानिक बाजारात द्राक्षांची आवक कमी होत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या मुंबई फळ मार्केट, पुणे, नागपूर येथे लोकल तसेच नाशिकच्या द्राक्षांची आवक थोड्या थोड्या प्रमाणात होत असून ही द्राक्षे सध्या भाव खाताना दिसत आहेत.
आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी पुणे मार्केटमध्ये लोकल द्राक्षांची ९ क्विंटल आवक होऊन कमीत कमी भाव ८ हजार तर सर्वसाधारण बाजारभाव ११ हजार रुपये प्रति क्विंटल इतका होता. मुंबई फळ बाजारात सरासरी बाजारभाव ८ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.
मागच्या आठवड्यापासून स्थानिक बाजारात द्राक्षांची आवक होत असून सर्वसाधारणपणे ८ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहेत.
द्राक्षाचे बाजारभाव (रु/ प्रति क्विंटल)
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
१७ नोव्हेंबर १२ | |||||
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | 44 | 6000 | 10000 | 8000 |
पुणे | लोकल | 9 | 8000 | 14000 | 11000 |
नागपूर | नाशिक | 74 | 6000 | 9000 | 8250 |
१६ नोव्हेंबर २३ | |||||
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | 22 | 7000 | 10000 | 8500 |
पुणे | लोकल | 33 | 7000 | 13000 | 10000 |
१५ नोव्हेंबर २३ | |||||
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | 58 | 7000 | 12000 | 9500 |