Lokmat Agro >बाजारहाट > आभाळ मोकळं होताच कांदा घसरला; आजचे बाजारभाव असे आहेत

आभाळ मोकळं होताच कांदा घसरला; आजचे बाजारभाव असे आहेत

Today's market prices are as follows | आभाळ मोकळं होताच कांदा घसरला; आजचे बाजारभाव असे आहेत

आभाळ मोकळं होताच कांदा घसरला; आजचे बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २८ नोव्हेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांतील बाजारभाव जाणून घेऊ.

आज दिनांक २८ नोव्हेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांतील बाजारभाव जाणून घेऊ.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक २८ नोव्हेंबर २३ रोजी लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची ४६५० क्विंटल, तर लाल कांद्याची ३५१० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी २ हजार रु. प्रति क्विंटल, तर सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. लाल कांद्याला कमीत कमी २ हजार रुपये, तर सरासरी ४१५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला ४२०० रुपये सरासरी  बाजारभाव मिळाला. या ठिकाणी सकाळच्या सत्रात ५४०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. तर पोळ कांद्याची ९ हजार क्विंटल आवक झाली.

रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर सोमवारी सकाळी जेव्हा बाजार सुरू झाला, तेव्हा कांद्याची आवक घटली होती. त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेता कांदा लिलावांना भावही वाढले होते. साधारणत: मागील आठवड्याच्या तुलनेत १ ते दीड हजार रुपयांनी भाव वाढले होते. मात्र आज दिनांक २८ रोजी सकाळी आवक पुन्हा सुधारू लागली त्यामुळे कांद्याचे भाव सुमारे ५०० रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील आजचे बाजारभाव (रु/प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---6236300046003800
सातारा---146200040003000
लासलगावलाल3510200045124150

लासलगाव

- विंचूर

लाल2505210045004000
पंढरपूरलाल20630046002800
नागपूरलाल700300040003750
मनमाडलाल825105245004000

सांगली

-फळे भाजीपाला

लोकल157580050002900
पुणेलोकल7741200046003300
पुणे -पिंपरीलोकल2400040004000
पुणे-मोशीलोकल161120030002100
कल्याणनं. १13320040003600
नागपूरपांढरा700400050004750
पिंपळगाव बसवंतपोळ9000200047914100
येवला -अंदरसूलउन्हाळी2000110044014200
लासलगावउन्हाळी4650200046004200
लासलगाव - विंचूरउन्हाळी4245200043904100
सिन्नर - नायगावउन्हाळी320100040003500
कळवणउन्हाळी7500200048504100
मनमाडउन्हाळी495200043714000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी5400220149004200
भुसावळउन्हाळी14350042003800

Web Title: Today's market prices are as follows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.