आज सकाळच्या सत्रात सोलापूर बाजारसमितीत गवारीचे दर वधारल्याचे दिसून आले. गवारीचे कमीत कमी दर आज येथे ५ हजार रुपये प्रति क्विंटल होते. कालच्या तुलनेत या भावात एक हजाराने वाढ झाल्याचे दिसून आले. अकलूज बाजारसमितीत कालच्या तुलनेत आज गवारीला १५०० रुपयांनी जास्त भाव मिळाला. आज या ठिकाणी गवारीचे कमीत कमी बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल असे होते.
दैनिक लोकमत ॲग्रोच्या या पोर्टलवर शेतकऱ्यांना बाजारभाव समजताना सुविधा व्हावी म्हणून ‘स्मार्ट बाजारभावा’ची सोय करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील लिलावानंतरचे अधिकृत बाजारभाव कृषी पणन मंडळाच्या सौजन्याने येथे वेळोवेळी प्रसिद्ध होत राहतात. जसजसे लिलाव होतील, तसतसे बाजारभावांची माहिती वाढत जाते.
सुमारे दीड महिन्यांपासून ‘स्मार्ट बाजारभावां’मुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली आहे. कालच्या तुलनेत कुठल्या शेतमालाचे बाजारभाव वधारले किंवा घटले ते एकाच ठिकाणी समजते. ज्या शेतमालाचे बाजारभाव घसरतात, त्या ठिकाणी कंसात लाल रंगात किती रुपयांनी घसरले, तो आकडा येतो, तर ज्या ठिकाणी बाजारभाव वधारतात, त्याच्या पुढे कंसात हिरव्या अंकात कितीने बाजारभाव वाढले, त्याचा आकडा जागेवरच कळतो.
बाजारभावांप्रमाणेच कालच्या तुलनेत आज शेतमालाची आवक वाढली किंवा घटली हेही लोकमत ॲग्रोच्या बाजारभावांमुळे समजते. हे बाजारभाव पाहण्यासाठी ‘बाजारभाव’ मुख्य पानावरील बाजारभाव दालनावर पाहतात येतात. बाजारसमितीनुसार, शेतमालाच्या प्रकारानुसार आणि वाणानुसार बाजारभाव पाहता येतात.
खालील लिंकचा वापर करूनही ‘स्मार्ट बाजारभाव’ पाहता येतील.
https://www.lokmat.com/agriculture/todays-bajar-bhav/