Join us

पिंपळगावी ऐन मकर संक्रांतीला कांदा बाजारभावाचा पतंग कटला; आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 2:35 PM

onion market price पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज मकर संक्रांतीला (sankranti) पोळ कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. राज्यात आज इतर बाजारसमितीत कांद्याचे बाजारभाव काय आहेत ते जाणून घेऊ या.

आज मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी रोजी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत शनिवारच्या तुलनेत पोळ कांद्याची आवक वाढली, त्यामुळे शनिवारच्या तुलनेत पोळ कांद्याचे (onion market rate) भाव कमीत कमी भाव १०० रुपयांनी घसरून अवघ्या ३०० रुपये क्विंटलवर आले.

आज सकाळच्या सत्रात पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत ११ हजार ७०० क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ३०० तर सरासरी १६५० रुपये प्रति क्विंटल इतका होता. लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी बाजारभाव ८०० तर सरासरी बाजारभाव १६६० रुपये इतका मिळाला.

छत्रपती संभाजी नगर येथे लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच २०० रुपये कमीत कमी बाजारभाव मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील आजचे सकाळच्या सत्रातले कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत कमी

दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---869050027001500
छत्रपती संभाजीनगर---9912001700950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---11755140022001800
सातारा---268100019001500
लासलगावलाल950380020511660
लासलगाव - विंचूरलाल928060018001600
सिन्नर - नायगावलाल77450016501575
मनमाडलाल460030017081600
पेनलाल309300032003000
सांगली -फळे भाजीपालालोकल539350022001350
पुणेलोकल1189670021001400
पुणे -पिंपरीलोकल6160016001600
पुणे-मोशीलोकल6784001500950
कामठीलोकल12150025002000
पिंपळगाव बसवंतपोळ1170030020561650
टॅग्स :कांदाबाजारमकर संक्रांती