Join us

निर्यातबंदी नंतर आजचे कांदा बाजारभाव काय आहेत? जाणून घेऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 4:24 PM

onion export ban : कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे आज दिनांक ८ डिसेंबर २३ रोजी राज्यातील अनेक बाजारसमित्यांमधले कांदा लिलाव बंद होते. मात्र काही ठिकाणी सकाळच्या सत्रात लिलाव झाले. त्यावेळी कालच्या तुलनेत आवक आणि बाजारभाव दोघांमध्येही घसरण पाहायला मिळाली.

देशातील कांदाबाजारभाव नियंत्रणात राहावेत या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला असून आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे अनेक बाजारसमित्यांतील लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले, तर काही ठिकाणी बाजारभावांत हजार ते पंधराशे रुपयांनी घसरले, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

आज लासलगावच्या विंचूर उप बाजारसमितीत सकाळच्या सत्रात १४५ नग उन्हाळ कांद्याची आवक झाली, तर ३६७ नग लाल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी २००० हजार रुपये, तर सरासरी ३४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. लाल कांद्याला कमीत कमी १ हजार व सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल  दर मिळाला. विंचूर, मनमाड आणि निफाड बाजारसमित्यांमध्ये आज लिलाव सुरू होते. तर लासलगाव, पिंपळगावसह मालेगाव परिसरातील कांद्याच्या बाजारसमित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले होते. 

कांदा निर्यातबंदीसाठी नाशिकचे कृषी अधिकारी व यंत्रणा कारणीभूत?

निर्यात बंदीचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा बाजारसमित्यांमध्ये  आणला नाही. तर चांदवड येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोकोही केला.

आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---4499150046003000
अकोला---1027250040003500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---10693270043003500
दौंड-केडगाव---523200050003700
लासलगाव - विंचूरलाल5600100033002500

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल291090040002450
पुणेलोकल10505200048003400
पुणे- खडकीलोकल1350035003500
पुणे -पिंपरीलोकल11300050004000
पुणे-मोशीलोकल363100035002250
कामठीलोकल22350045004000
कल्याणनं. १3450055005000
मनमाडउन्हाळी750100030502600
भुसावळउन्हाळी17230030002500
राहताउन्हाळी1462100041002950
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरी