Join us

उन्हाळी कांदा किती घसरावा? या बाजारसमितीत कांदा बाजारभाव १०० रुपये, जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 6:44 PM

आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी राज्यात कांद्याचे बाजारभाव घसरल्याचे दिसून आले. लासलगाव, पिंपळगाव, येवला या बाजारसमित्या बंद राहिल्याने नगर, संगमनेर, पुणे परिसरात कांदा विक्रीसाठी आला.

हमाल मापारी यांच्या संपामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-पिंपळगावसह अनेक महत्त्वाच्या कांदाबाजार समित्या बंद असल्या तरी लासलगावची उपबाजार समिती असलेली विंचूर बाजारसमिती सुरू आहे.

आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विंचूर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी ७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. याठिकाणी कांद्याची १९ हजार ६७४ क्विंटल आवक झाली. 

दरम्यान नाशिकमधील बाजारसमित्यांतील कांदा व्यवहार बंद असल्याने कोपरगावसह शेजारील तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपल्याकडचा कांदा संगमनेर, नगर बाजारसमित्यांकडे वळवला. त्यामुळे या ठिकाणी कांद्याची चांगली आवक झाली. संगमनेर बाजारसमितीत आज कांद्याची सुमारे साडे सतरा हजार क्विंटल, तर नगर बाजारसमितीत सुमारे ३९ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली.

मात्र संगमनेर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याचे सर्वात कमी असे कमीत कमी दर दिसून आले. उन्हाळी कांद्याला या ठिकाणी कमीत कमी १०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर सरासरी अवघा ८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

नगर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी दीडशे रुपये, तर सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

08/04/2024
कोल्हापूर---520160018001200
छत्रपती संभाजीनगर---23203001450875
चंद्रपूर---417130020001500

चंद्रपूर -

गंजवड

---417130020001500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---17531120017001450
सातारा---114100016001300
हिंगणा---3180020002000
कराडहळवा7550017001700
सोलापूरलाल2258520020001100
बारामतीलाल84030014001000

अमरावती-

फळ आणि भाजीपाला

लाल54060019001250
जळगावलाल26713801277825
नागपूरलाल2000100015001375
इंदापूरलाल4452501600800

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल519240016001000
पुणेलोकल1470660016001100
पुणे- खडकीलोकल2270015001100
पुणे -पिंपरीलोकल9100014001200
पुणे-मोशीलोकल8314001200800

चाळीसगाव-

नागदरोड

लोकल4100115013501250
मंगळवेढालोकल14120017101400
कामठीलोकल10150025002000
शेवगावनं. १750110015001100
शेवगावनं. २106560010001000
शेवगावनं. ३640200500500
नागपूरपांढरा1500110015001400
अहमदनगरउन्हाळी3952015016001050
नाशिकउन्हाळी494070015251300

लासलगाव

- विंचूर

उन्हाळी1967470014801350
राहूरी -वांबोरीउन्हाळी11602001500900
संगमनेरउन्हाळी176831001601850
नेवासा -घोडेगावउन्हाळी504820016001300
गंगापूरउन्हाळी24786513701207
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार