Join us

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज असे आहेत कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 3:51 PM

आशियातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारसमिती जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निर्षेधार्थ आज बंद ठेवण्यात आली होती, तसेच उपबाजार समिती विंचूरही बंद होती.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजारसमितीत आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात सुमारे २६ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. प्रतवारीनुसार या ठिकाणी कमीत कमी ९०१ जास्तीत जास्त ३०६० तर सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

मालेगाव-मुंगसे येथे १९ हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक होऊन ७००-२३५१-२०५० रुपये असा भाव होता. कळवण येथे उन्हाळ कांद्याची २१ हजार ३०० क्विंटल आवक होऊन ६००-२६६५-२००१ असे दर राहिले.

दरम्यान आशियातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारसमिती जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निर्षेधार्थ आज बंद ठेवण्यात आली होती, तसेच उपबाजार समिती विंचूरही बंद होती. निफाड बाजारसमिती सकाळी बंद होती, मात्र दुपारच्या सत्रात येथील खरेदी विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले होते.

दरम्यान महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज नाशिकसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांदाचे भाव असे राहिले. 

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/09/2023
कोल्हापूर---4431100026001800
औरंगाबाद---47240022001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---15511100025001750
सातारा---209150025002000
हिंगणा---3230023002300
कराडहालवा150100025002500
धुळेलाल6220021001750
पेनलाल300320034003200
सांगली -फळे भाजीपालालोकल242660026001600
पुणेलोकल994180024001600
पुणे- खडकीलोकल9120018001500
पुणे -पिंपरीलोकल2120018001500
पुणे-मोशीलोकल25280020001400
चाळीसगाव-नागदरोडलोकल200030021511900
मंगळवेढालोकल8183024002110
कल्याणनं. १3200024002200
येवलाउन्हाळी800037024252000
येवला -आंदरसूलउन्हाळी400055023992100
मालेगाव-मुंगसेउन्हाळी1900070023512050
सिन्नर - नायगावउन्हाळी116120021301850
कळवणउन्हाळी2130060026652001
चांदवडउन्हाळी7000100025992180
मनमाडउन्हाळी270050022211900
पिंपळगाव बसवंतउन्हाळी2600090130602250
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीमराठा क्रांती मोर्चा