Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

Today's onion price in Lasalgaon, Pimpalgaon and vinchur | लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

लासलगाव, पिंपळगावला कांद्याला सरासरी दोन हजाराचा भाव

विंचूर उप बाजार समितीत आज दिवसभरात ८२६ नग कांदा व एकूण १४ हजार ४२ क्विंटल कांदा आवक झाली. जाणून घ्या आजचे कांद्याचे भाव.

विंचूर उप बाजार समितीत आज दिवसभरात ८२६ नग कांदा व एकूण १४ हजार ४२ क्विंटल कांदा आवक झाली. जाणून घ्या आजचे कांद्याचे भाव.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक २६ जुलै रोजी निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, सायखेडा या ठिकाणी सुमारे ३ हजारावर नग कांदा आवक होऊन शेतकऱ्यांना सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. विंचूर कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे सहसचिव अशोक गायकवाड यांनी ही माहिती दिली.

विंचूर उप बाजार समितीत आज दिवसभरात ८२६ नग कांदा व एकूण १४ हजार ४२ क्विंटल कांदा आवक झाली.  उन्हाळ कांद्याला किमान दर प्रति क्विंटल पाचशे रुपये, कमाल २३०० रुपये तर सरासरी २०५० रुपये असा मिळाला. गोल्टा खाद कांद्याला किमान दर १५०० रुपये, कमाल दर २३११ तर सरासरी २१०० असा दर मिळाला.

लासलगाव बाजार समितीत आज ७४५ नगांमिळून १० हजार ६४८ क्विंटल आवक झाली.  उन्हाळ कांद्याला किमान ६०० रुपये, कमाल २३०१ रुपये, तर सरासरी २०५१ रुपये दर मिळाला. 

निफाड बाजार समितीत ४३६ , पिंपळगाव बाजारसमितीत ५७९, तर सायखेडा बाजारसमितीत ५६० नग कांदा आवक झाली. निफाड येथे ८००-२३०२-२०२५, पिंपळगाव येथे १६५०-२५२५-२०५०, सायखेडा येथे ११००-२३००-१९५० असे प्रतिक्विंटल दर होते. दरम्यान उद्या रविवारी बाजारसमितीचे लिलाव सुटीमुळे बंद असणार आहेत.

Web Title: Today's onion price in Lasalgaon, Pimpalgaon and vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.