सकाळच्या सत्रात पुण्यात मालदांडी ज्वारीची चमक वाढली असून शाळू, लोकल, हायब्रीड ज्वारीच्या तुलनेत क्विंटलमागे अधिक दर मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात पुण्यात सर्वाधिक ज्वारीची आवक झाली. यावेळी ६९८ क्विंटल ज्वारी बाजारात विक्रीकरीता आली होती. शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत असून कमीत कमी ४५़०० तर जास्तीत जास्त ५५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
पणन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज सकाळच्या सत्रात राज्यात ९९२ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी जळगावात हायब्रीड आणि दादर ज्वारीची आवक झाली होती. तर बुलढाणा, जालना बाजारसमितीत शाळू ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळू ज्वारीला सर्वसाधारण २१००ते २२०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.
दरम्यान, काल १३ हजार ८७५ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. यावेळी सर्वाधिक भाव पुण्यात मालदांडी ज्वारीलाच मिळाला असून मुंबईत लोकल ज्वारीलाही चांगला भाव मिळाला. आज कोणत्या बाजारसमितीत काय भाव सुरु आहे? जाणून घ्या..
शेतमाल: ज्वारी
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
15/05/2024 | |||||
अमरावती | लोकल | 57 | 1800 | 2100 | 1950 |
बुलढाणा | शाळू | 30 | 2000 | 2200 | 2100 |
जळगाव | हायब्रीड | 131 | 2040 | 2060 | 2050 |
जळगाव | दादर | 42 | 2400 | 2400 | 2400 |
जालना | शाळू | 34 | 1875 | 2200 | 2141 |
पुणे | मालदांडी | 698 | 4500 | 5500 | 5000 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 992 |