राज्यात सोयाबीनची आवक घटली असून मागील चार दिवसांपासून बाजारपेठेत विक्रीत चढउतार दिसून येत आहे.आज सकाळच्या सत्रात राज्यात २४५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी लातूरमध्ये १९४ क्विंटल सोयाबीनसाठी क्विंटलमागे साधारण ४४०१ रुपयांचा दर मिळाला.
यावेळी यवतमाळमध्ये ४० क्विंटल सोयाबीनला ४४०० रुपयांचा भाव मिळत असून धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला ४४७५ रुपयांचा भाव मिळत आहे. परभणी बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी ४३५० तर जास्तीत जास्त ४४५० रुपयांचा दर मिळाला. बुलढाण्यात आज केवळ एक क्विंटल सोयाबीन आले. यावेळी सर्वसाधारण ४३०० रुपयांचा दर मिळाला.
शेतमाल: सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
03/04/2024 | |||||
बुलढाणा | पिवळा | 1 | 4300 | 4300 | 4300 |
धाराशिव | पिवळा | 3 | 4401 | 4475 | 4401 |
लातूर | पांढरा | 194 | 4221 | 4625 | 4475 |
परभणी | पिवळा | 7 | 4350 | 4350 | 4350 |
यवतमाळ | पिवळा | 40 | 4300 | 4500 | 4400 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 245 |