Tur Rates Today : राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. तर आज राज्यभरातील बाजार समित्यांना सुट्ट्या असल्यामुळे केवळ ४ बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली होती. त्यातील पैठण बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. तर उर्वरित तीन बाजार समित्यांमध्ये १० हजार रूपयांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे.
दरम्यान, आज पैठण बाजार समितीमध्ये १ क्विंटल, रामटेक बाजार समितीमध्ये ३ क्विंटल, औसा बाजार समितीमध्ये ५ क्विंटल आणि बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल तुरीची १२ क्विंटल आवक झाली होती. तर रामटेक बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
औसा बाजार समितीमध्ये आज १० हजार १७४ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून बुलढाणा बाजार समितीमध्ये १० हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमधील तुरीची आवक कमी होताना दिसत आहे.
आजचे सविस्तर तुरीचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/07/2024 | ||||||
पैठण | --- | क्विंटल | 1 | 8800 | 8800 | 8800 |
रामटेक | --- | क्विंटल | 3 | 10600 | 11000 | 10800 |
औसा | लाल | क्विंटल | 5 | 10000 | 10511 | 10174 |
बुलढाणा | लाल | क्विंटल | 12 | 10000 | 11300 | 10700 |