Join us

Today's Tur Rates : आज केवळ २१ क्विंटल तुरीची आवक! राज्यभरात किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:38 PM

Market Yard Tur Rates : राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. तर आज राज्यभरातील बाजार समित्यांना सुट्ट्या असल्यामुळे केवळ ४ बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली होती.

Tur Rates Today : राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. तर आज राज्यभरातील बाजार समित्यांना सुट्ट्या असल्यामुळे केवळ ४ बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली होती. त्यातील पैठण बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. तर उर्वरित तीन बाजार समित्यांमध्ये १० हजार रूपयांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज पैठण बाजार समितीमध्ये १ क्विंटल, रामटेक बाजार समितीमध्ये ३ क्विंटल, औसा बाजार समितीमध्ये ५ क्विंटल आणि बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल तुरीची १२ क्विंटल आवक झाली होती. तर रामटेक बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

औसा बाजार समितीमध्ये आज १० हजार १७४ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून बुलढाणा बाजार समितीमध्ये १० हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमधील तुरीची आवक कमी होताना दिसत आहे.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/07/2024
पैठण---क्विंटल1880088008800
रामटेक---क्विंटल3106001100010800
औसालालक्विंटल5100001051110174
बुलढाणालालक्विंटल12100001130010700
टॅग्स :बाजारमार्केट यार्ड