Tomato Market : गेल्या दोन आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात (Tomato Bajarbhav) सातत्याने घसरण सुरू असून मागील आठवड्याचे बाजार भाव पाहिले असता आवक वाढली आहे. तर टोमॅटोच्या दरात देखील 19 टक्क्यांची वाढ झाल्याचं साप्ताहिक बाजार अहवालावरून निदर्शनास आले आहे.
टोमॅटोच्या पुणे बाजारातील (Tomato Pune Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु.1866 रुपये प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत 19 टक्के वाढ झाली आहे. तर इतर ठिकाणी म्हणजेच मुंबई बाजारात 2580 रुपये, नारायणगाव बाजारात 1500 रुपये, संगमनेर बाजारात 1118 रुपये तर सोलापूर बाजारात 966 रुपये दर मिळाला.
देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये 3.9 टक्के वाढ झाली आहे. प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिकं किंमती (रु.2580/क़्वि.) होत्या तर सोलापूर बाजारात कमी किंमती (रु. 966/ क़्वि.) होत्या.
आजचे बाजारभाव पाहुयात....
आजच्या बाजार भाव अहवालानुसार सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 01 हजार रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला यात छत्रपती संभाजीनगर बाजारात 1400 रुपये तर पाटण बाजार 1750 रुपये दर मिळाला. अकलूज बाजारात लोकल टोमॅटोला 01 हजार रुपये, पुणे बाजारात 1300 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला एक हजार रुपये तर जळगाव बाजार 1500 रुपये आणि नागपूर बाजारात 2250 रुपये दर मिळाला.