Join us

बाजारातील टोमॅटो आवक घटली; असे आहेत आजचे टोमॅटोचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 1:45 PM

आज दिनांक ९ जानेवारी २४ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील व्यवहारांत टोमॅटोचे बाजारभाव काय आहेत, ते जाणून घेऊ

आज दिनांक ९ जानेवारी २४ रोजी पुणे जिल्हयातील मोशी बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लोकल टोमॅटोची ३५० क्विंटल आवक होऊन कमीत कमी भाव १००० रुपये प्रति क्विंटल असे मिळाले. खेड तालुक्यातील चाकण बाजारसमितीतहीटोमॅटोला मोशी इतकाच भाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत मात्र टोमॅटोला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ९५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

टोमॅटोच्या पुणे बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु. १८२६ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ५ टक्केनी वाढ झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये ७.१ टक्केनी घट झाली आहे. राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये घट झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत वाढ झाली असल्याची माहिती पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने दिली आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत ॲग्रो चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

आजचे टोमॅटो बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
छत्रपती संभाजीनगर---1126001300950
खेड-चाकण---360100020001500
सातारा---70100020001500
राहता---8750016001100
कळमेश्वरहायब्रीड20111015001325
पुणे -पिंपरीलोकल10200025002250
पुणे-मोशीलोकल355100015001250
कामठीलोकल7850015001000
इस्लामपूरनं. १72110015001250
टॅग्स :टोमॅटोपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरी