यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक टोमॅटोबाजारात आणल्यामुळे प्रति किलो २० ते २२ रुपये दराने विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मोडनिंब येथील कृषी उत्पन्न बाजारासह अन्य ठिकाणी असलेला टोमॅटो खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून परराज्यामध्ये माढा, मोहोळ व पंढरपूर या तिन्ही तालुक्यातून येणारा टोमॅटो मोडनिंबमधून सुमारे ५० ट्रक दररोज जात आहे.
जयपूर, राजस्थान, म्हैसाणा, दिल्ली यासह अन्य राज्यांमध्ये मार्केटमधील टोमॅटो विक्रीसाठी जात आहे. यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक टोमॅटो बाजारात आणल्यामुळे प्रति किलो २० ते २२ रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मागील वर्षी टोमॅटो उत्पादन सुरू झाल्यापासून पंधरा ते वीस दिवसांमध्ये टोमॅटोचे दर कोसळले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच टोमॅटोचे दर स्थिर असल्यामुळे व अन्य राज्यांमध्ये टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या भागातील टोमॅटो खरेदीदार व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.