Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

Tomato Market: How much get the market price of tomatoes is 10 kg | Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

Tomato Market टोमॅटोला दहा किलोस मिळतोय इतका बाजारभाव

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबईबाजारपेठेत उंचावत आहे.

सध्या दहा किलोचा दर साडे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे. टोमॅटो पिकाकडे शेतकरी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पाहत असतात. उत्पादन खर्च जास्त असल्याने आणि दराची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे.

दर चांगला लागला तर हे पीक मालामाल करत असते. दराने निच्चांकी गाठली तर उत्पादन खर्च निघत नाही. अनेक वर्षांचा अनुभव घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दर वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या लागणीचे तोडे जूनपासून सुरू होतात.

कोपर्डे हवेली परिसरात इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जादा टोमॅटोच्या लागणी करत असतात यावर्षी अनेकांना चांगला दर मिळाला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहा किलोचा दर सहाशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता सध्या मुंबईबाजारपेठेत टोमॅटोच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहेत.

दहा किलोला साडे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या देशभर टोमॅटोचे दर वाढले आहेत. केंद्रशासित प्रदेशात अंदमान, निकोबार, पाँडेचेरी आदींसह इतर राज्यात दहा किलोचा टोमॅटोचा दर एक हजार रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

टोमॅटोचे दर वाढण्याची कारणे
• वाढत्या तापमानामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा गेल्या, तर अवकाळी पावसामुळे बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
• इतर भाजीपाल्याची आवक बाजारपेठेत कमी झाली आहे. भाजीसाठी टोमॅटोचा वापर वाढला, चाकरमानी मुंबईत दाखल झाले. शाळा, विद्यालये, कॉलेज सुरू झाली.

मी प्रत्येक वर्षी टोमॅटो उत्पादन घेत असतो. सध्या माझी २५ गुंठे क्षेत्रावर टोमॅटोची बाग आहे. पहिला तोडा एक टन निघाला आहे. दुसऱ्या तोड्यानंतर यामध्ये वाढ होणार आहे. सध्या चांगल्या टोमॅटोचा दहा किलोचा दर पाचशे रुपये आहे. पुढे अजून दर वाढेल अशी अपेक्षा आहे. - सागर चव्हाण, टोमॅटो उत्पादक, कोपर्डे हवेली

Web Title: Tomato Market: How much get the market price of tomatoes is 10 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.