Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव

Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव

Tomato Market Narayangaon In Narayangaon market, tomato fetches high prices, one carat fetches the same price. | Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव

Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव

टोमॅटोला चांगला बाजारभाव Tomato Market मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक कॅरेट ९०० रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे.

टोमॅटोला चांगला बाजारभाव Tomato Market मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक कॅरेट ९०० रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मंचर : टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक कॅरेट ९०० रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दरदेखील कडाडले आहेत. यात आता टोमॅटोलादेखील चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जुन्नरच्या नारायणगाव उपबाजारात एका कॅरेटला ७०० रुपयांच्या वर उच्चांकी दर मिळत आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक अनिश्चित बाजारभावाचे पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठीक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, भराडी, पारगाव, काठापूर भागात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदाही टोमॅटोचे पीक शेतकऱ्यांनी घेतले.

परंतु, सुरुवातीला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या. आता मात्र टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. या भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे.

किरकोळ बाजारात दुप्पट भाव
बाजार समितीत टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने प्रति किलोला हा दर ४० ते ५० रुपये आहे. दहा दिवसांपूर्वी किलोला हाच भाव २० ते २५ रुपये मिळत होता. आता टोमॅटोला दुप्पटीने दर मिळत आहे.

आवक घटली
नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक घटली असल्याने टोमॅटोला आता उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. एक नंबर टोमॅटोच्या २० किलोंच्या कॅरेटला मागील २ दिवसांपासून आणि आज सकाळी तब्बल ८०० पेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर सरासरी हा भाव ६०० ते ९०० रुपये दर मिळत आहे.

अधिक वाचा: Farmer Success Story नरवाडच्या सचिनने तीन महिन्यात बेबी कॉर्न मक्यातून काढले ८० हजारांचे उत्पन्न

Web Title: Tomato Market Narayangaon In Narayangaon market, tomato fetches high prices, one carat fetches the same price.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.