Lokmat Agro >बाजारहाट > दोनशे रुपयांना ओरड, दोन रुपयांवर मौन का ? असे आहेत टोमॅटो बाजार भाव

दोनशे रुपयांना ओरड, दोन रुपयांवर मौन का ? असे आहेत टोमॅटो बाजार भाव

Tomato market price, farmers are getting only 2 rupees per kg | दोनशे रुपयांना ओरड, दोन रुपयांवर मौन का ? असे आहेत टोमॅटो बाजार भाव

दोनशे रुपयांना ओरड, दोन रुपयांवर मौन का ? असे आहेत टोमॅटो बाजार भाव

टोमॅटो बाजार भावाने शेतकऱ्यांना रडविले. मेहनत आणि खर्च करूनही पदरात काहीच नाही. जाणून घ्या टोमॅटोचे बाजारभाव.

टोमॅटो बाजार भावाने शेतकऱ्यांना रडविले. मेहनत आणि खर्च करूनही पदरात काहीच नाही. जाणून घ्या टोमॅटोचे बाजारभाव.

शेअर :

Join us
Join usNext

योगेश गुंड
 टोमॅटोने दराचे अनेक मजले चढत दोनशे रुपयांवर मजल मारल्यानंतर ग्राहकांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना घामाचे चार पैसे मिळू लागले तोपर्यंत दरात घसरण होता. सुरू झाली आहे. आता दोन रुपये किलोने टोमॅटो विकण्याची वेळ आल्यानंतर सगळेच चिडीचूप आहेत.

नगरच्या शेतकऱ्यांना टोमॅटोला कमी दर मिळत असल्याने काढणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मार्केटमधील सर्वात स्वस्त भाजी म्हणून टोमॅटो विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी पाच दहा रुपये किलोने विक्री करावी लागत असताना मध्यंतरी हा दर दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता आवक वाढल्याने पुन्हा दरात घसरण सुरू आहे.

नगरच्या बाजारात टोमॅटोला दर किती ?
नगरच्या होलसेल बाजारात २ ते ५ रुपये तर किरकोळ बाजारात १० रुपये किलो दराने विक्री होत आहे. हा दर काही महिन्यांपूर्वी दीडशे ते दोनशे रुपये होता.

काढणीचाही खर्च निघेना
शेतामध्ये पीक लागवड, काढणी करून तो माल बाजारपेठेत आणेपर्यंत शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. तरीही आता हाती दोन ते तीन रुपये पडत असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे.

शेतीत केलेला खर्चही आता निघेना. याउलट बाजारात माल पाठवेपर्यंत होणाऱ्या खर्चाचा भुदंडही सोसावा लागतो. त्यामुळे टोमॅटोची शेती न परवडणारी झाली आहे. यातून कर्जबाजारी होण्याचाच धोका अधिक दिसत आहे.
-संतोष लिंभोरे, शेतकरी

शेतकरी कैवारी म्हणून आव आणणाऱ्या सरकारने महागाईच्या नावाखाली टोमॅटो आयात केला आणि बाजारातील आवकही वाढली. परिणामी, १५ दिवसांतच १६० ते १८० रुपये किलोपर्यंत गेलेला टोमॅटो सध्या ८ ते १२ रुपये किलोवर आला आहे. भाव होता तेव्हा माल नव्हता आणि माल आला तर भाव कोसळले आहेत. टोमॅटोची तोडणी करण्यासह सध्याचा दर परवडत नसून भाव स्थिर राहण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
- किशोर चाबुकस्वार, शेतकरी

काढणीचाही खर्च निघेना
शेतामध्ये पीक लागवड, काढणी करून तो माल बाजारपेठेत आणेपर्यंत शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. तरीही आता हाती दोन ते तीन रुपये पडत असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे.

शेतकऱ्यांना दोन रुपये, ग्राहकांना दहा रुपयांना
शेतात घाम गाळून पिकविलेल्या टोमॅटोसाठी प्रतिकिलो दोन रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. तोच टोमॅटो ग्राहकांच्या पिशवीत जाईपर्यंत मार्केट, होलसेल विक्रेते, किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दहापेक्षाही जास्त रुपये प्रति किलो असा विक्री होत आहे. पिकविणारा व खाणारा यांच्या दरात फार मोठा फरक दिसतो. व्यापाऱ्यांच्या मते बाजार शुल्क, वाहतूक खर्च, कमिशन यातून हा दर वाढतो.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये टोमॅटो बाजारभाव असे आहेत. (प्रति क्विंटल, रूपये)

बाजार समितीआवक

कमीत कमी

 

जास्तीत

जास्त 

सर्वसाधारण

 

दिनांक २२ सप्टेंबर २३
पुणे -पिंपरी22700800750
दिनांक २१ सप्टेंबर २३
कोल्हापूर152200700500
अहमदनगर2732001500850
पुणे-मांजरी502400900600
औरंगाबाद234400600500
मंचर1180018001800
श्रीरामपूर15150025002000
विटा30400500450
सातारा1325001000750
राहता505001200800
कळमेश्वर2082512001045
रामटेक68100014001200
अमरावती- फळ आणि भाजीपाला120100012001100
पुणे20432001000600
पुणे- खडकी22500900700
पुणे -पिंपरी427001000850
पुणे-मोशी686500700600
नागपूर10008001000950
चांदवड50150350275
पेन396220024002200
वाई90500800650
मंगळवेढा50100500350
कामठी166001000800
पनवेल6198001000900
मुंबई21408001000900
इस्लामपूर32500700600
सोलापूर448100500250
जळगाव125400700500
नागपूर5008001000950
भुसावळ3050012001000
दिनांक २० सप्टेंबर २३
कोल्हापूर3084001100800
पुणे-मांजरी563400900600
औरंगाबाद165300600450
सिन्नर - हिवरगांव6773150625450
राहूरी632001000600
पाटन12100014001200
संगमनेर5880200500375
मंचर2100010001000
श्रीरामपूर23250030002700
पिंपळगाव बसवंत67761150605375
नवापूर122500750611
सातारा4680012001000
राहता2650015001000
कळमेश्वर2282512001045
रामटेक54100014001200
अमरावती- फळ आणि भाजीपाला1208001000900
पुणे15352001000600
पुणे- खडकी20400800600
पुणे -पिंपरी268001000900
जुन्नर - नारायणगाव1550250600400
नागपूर10008001000950
चांदवड55150840250
मंगळवेढा86100800300
कामठी306001000800
पनवेल5538001000900
मुंबई1652100012001100
रत्नागिरी198001000900
सोलापूर7572001000800
जळगाव110300600400
नागपूर4408001000950
कराड2780010001000
फलटण11350650520
भुसावळ43100015001200
 

Web Title: Tomato market price, farmers are getting only 2 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.