Lokmat Agro >बाजारहाट > टोमॅटोसह भाजीपाल्याचे बाजार भाव कोसळले, पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या

टोमॅटोसह भाजीपाल्याचे बाजार भाव कोसळले, पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या

tomato market prices are declining in Pimpalgaon | टोमॅटोसह भाजीपाल्याचे बाजार भाव कोसळले, पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या

टोमॅटोसह भाजीपाल्याचे बाजार भाव कोसळले, पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या

काल दिनांक ५ ऑगस्ट रोजी पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील बाजारसमितीत टोमॅटो बाजार भाव (tomato market rate) कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून निषेध नोंदवला होता. आज ६ ऑगस्ट रोजी दोडका व घेवडा १ रुपया किलो, तर ढोबळी मिरची २० रुपये किलो असा बाजार भाव होता.

काल दिनांक ५ ऑगस्ट रोजी पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील बाजारसमितीत टोमॅटो बाजार भाव (tomato market rate) कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून निषेध नोंदवला होता. आज ६ ऑगस्ट रोजी दोडका व घेवडा १ रुपया किलो, तर ढोबळी मिरची २० रुपये किलो असा बाजार भाव होता.

शेअर :

Join us
Join usNext

गणेश शेवरे
आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे दर खाली आले, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजारसमितीच्या आवारात ठिय्या आंदोलन करून लिलाव बंद पाडले.

आज पिंपळगाव बाजारसमितीत टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला सरासरी  १११ रुपये प्रती कॅरेट, जास्तीत जास्त २७५ प्रती कॅरेट, तर कमीत कमी ३५ रुपये प्रति कॅरेट इतका भाव मिळाला. पिंपळगाव बाजारसमितीने दिलेल्या माहितीनुसार आज ६ ऑगस्ट बाजार समितीत टोमॅटोची विक्रमी म्हणजेच २ लाख ४६ हजार ६२७ कॅरेट इतकी आवक झाली. 

टोमॅटोवर प्रक्रिया करा आणि तुम्हीच ठरवा त्याचा भाव


या संदर्भात पिंपळगाव बाजार समितीच्या प्रशासनासोबत संपर्क केला असता  त्यांनी सांगितले की कृष्ण जन्म आणि गोकुळ अष्टमी यानिमित्त गुजरात बाजारपेठ बंद असते गुजरात येथे मोठ्या प्रमाणात गोकुळाष्टमी व गोपालकाला साजरा केला जातो.  त्या अनुषंगाने पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज बुधवार दि ६ रोजी आलेल्या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांनी गुजरात बाजारपेठ बंद असल्याचे कारण देत  कमी भावाने शेतमाल  खरेदी केला.

प्रक्रिया करून टोमॅटोचे भाव कसे वाढवायचे? आताच क्लिक करा
 

राज्यातील बाजारसमित्यांमधील आजचे टोमॅटोचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतआवक

किमान भाव

(रुपयांत)

जास्तीत

जास्त भाव (रु)

सरासरी

भाव (रु)

06/09/2023
कोल्हापूर---36950015001000
औरंगाबाद---1655001000750
श्रीरामपूर---15250040003000
सातारा---62100015001250
राहता---445001000800
कल्याणहायब्रीड13200030002500
कळमेश्वरहायब्रीड21151520001805
पुणेलोकल216160014001000
पुणे- खडकीलोकल2380015001150
पुणे -पिंपरीलोकल25100014001200
नागपूरलोकल1000100015001325
वाईलोकल80100020001500
मंगळवेढालोकल682001000600
कामठीलोकल38100014001200
पनवेलनं. १1234160018001700
मुंबईनं. १2603120014001300
रत्नागिरीनं. १2505001100800
जळगाववैशाली1455001000700
नागपूरवैशाली680100015001325
भुसावळवैशाली38100020001500

Web Title: tomato market prices are declining in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.