Join us

Tomato Market Rates : बाजार समितीमध्ये आज टोमॅटोला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 9:16 PM

आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती दर मिळाला?

किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढले असून मार्केट यार्डमधील शेतकऱ्यांच्या टोमॅटोलाही चांगला दर मिळताना दिसत आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसामुळे शेतामध्ये असलेल्या टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळेच बाजारात टोमॅटोचे दर वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, आज राज्यभरातील केवळ पुणे बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार २११ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. तर ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ मांजरी बाजार समितीमध्ये आज ४८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. तर या बाजार समितीमध्ये ४ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

आजच्या किमान आणि कमाल सरासरी दराचा विचार केला तर पुणे-खडकी बाजार समितीमध्ये १ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या बाजार समितीमध्ये केवळ १८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. तर राज्यातील भुसावळ बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे टोमॅटोचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/06/2024
कोल्हापूर---क्विंटल176200053004000
पुणे-मांजरी---क्विंटल484350044004000
सातारा---क्विंटल62300040003500
राहता---क्विंटल58200055004000
पुणेलोकलक्विंटल3211200050003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल18150020001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल330300050004000
मंगळवेढालोकलक्विंटल6250040003500
धाराशिववैशालीक्विंटल5520052005200
भुसावळवैशालीक्विंटल13500060005500
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीटोमॅटो