Todays Tomato Rates : मागील दीड आठवड्यापासून राज्यभरातील पावसाचा जोर कमी झाला असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर जुलै महिन्यामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे खरिप हंगामातील अनेक भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आवकेत घट होऊन बाजारातील दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यंतरी टोमॅटोचेही दर चांगले वाढले होते. पण काही दिवसांतच टोमॅटोचेही दर खाली आहे.
दरम्यान, आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील लिलाव बंद आहेत. तर राज्यातील केवळ पुणे-पिंपरी, वाई आणि भुसावळ बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक झाल्याची माहिती कृषी पणन मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार लोकल आणि वैशाली वाणाच्या टोमॅटोची आवक झाली असून आजच्या दिवसातील १ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल हा सर्वांत कमी सरासरी दर होता.
(Latest Market Rate Updates)
वाई बाजार समितीमध्ये आज सर्वांत जास्त म्हणजेच १४० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. तर भुसावळ बाजार समितीमध्ये ५७ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. पुणे- पिंपरी येथे आवक झालेल्या १६ क्विंटल टोमॅटोला आज उच्चांकी सरासरी दर मिळाला असून येथील टोमॅटो १ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले आहेत. वाई बाजार समितीमध्ये आज १ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.
आजचे सविस्तर टोमॅटो दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
15/08/2024 | ||||||
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 16 | 1500 | 2000 | 1750 |
वाई | लोकल | क्विंटल | 140 | 1000 | 2500 | 1700 |
भुसावळ | वैशाली | क्विंटल | 57 | 1000 | 1500 | 1300 |