Join us

कल्याणमध्ये टोमॅटोला १० हजार, तर मुंबईत ८ हजार दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 4:03 PM

टोमॅटोला राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज नेहमीप्रमाणेच दर मिळाले. नेपाळहून भारत सरकारने टोमॅटो आवकेचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतातील एकूण गरजेच्या ही आवक एक टक्काही नसल्याने त्याचा टोमॅटोच्या दरावर फारसे परिणाम जाणवले नाहीत.

आवक कमी झाल्याने आज कल्याण बाजारसमितीत टोमॅटोचे जास्तीत जास्त दर १० हजार २०० रुपये प्रति क्विंटल राहिले. पुणे बाजारसमितीत आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी टोमॅटोची १९०४ क्विंटल आवक झाली. त्यामुळे जास्तीत जास्त दर ७ हजार, कमीत कमी  ३ हजार तर सर्वसाधारण ५ हजार रुपये प्रती क्विंटल असे होते. 

(हेही वाचा : नेपाळमधून टोमॅटोची आयात व तस्करीही; काय होणार परिणाम?)

मुंबई बाजार समितीत १३३५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. जास्तीत जास्त दर ८०००, कमीत कमी दर ७५००, तर सर्वसाधारण दर ७८०० असा होता. दरम्यान टोमॅटोचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचे ठरवले असून त्याची पहिली खेप आज शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी वाराणसी येथे दाखल होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अहमदनगर---क्विंटल149200080005000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल797350045004000
खेड-चाकण---क्विंटल126400070005500
श्रीरामपूर---क्विंटल13150017001600
राहता---क्विंटल26200090005500
कल्याणहायब्रीडक्विंटल3100001020010100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल69600070006500
पुणेलोकलक्विंटल1904300070005000
पुणे- खडकीलोकलक्विंटल2400060005000
पुणे-मोशीलोकलक्विंटल197300070005000
वाईलोकलक्विंटल80300090006000
मंगळवेढालोकलक्विंटल41100068004500
पनवेलनं. १क्विंटल515650070006750
मुंबईनं. १क्विंटल1395750080007800
रत्नागिरीनं. १क्विंटल20550070006500
जळगाववैशालीक्विंटल63500075006000

 

टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी