Join us

Tomato Rates Today : पावसाळ्यात टोमॅटोचे दर वाढले! किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:36 PM

Todays Tomato Market Rates : सध्या भाजीपाल्याचे दर वाढल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोलाही चांगला दर मिळताना दिसत आहे. आज राज्यातील टोमॅटोला संमिश्र दर मिळाला आहे.

Todays Tomato Rates : राज्यभरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सध्या भाजीपाल्याचे दर वाढल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोलाही चांगला दर मिळताना दिसत आहे. आज राज्यातील टोमॅटोला संमिश्र दर मिळाला आहे.

दरम्यान, आज वैशाली, नं. १, लोकल, हायब्रीड टोमॅटोची बाजारात आवक झाली होती. कोल्हापूर, पुणे-मांजरी, पुणे-मोशी, पनवेल आणि सोलापूर बाजार समितीमध्ये (Market Yard) सर्वांत जास्त टोमॅटोची आवक होताना दिसत आहे. तर मांजरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४९४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. 

भुसावळ बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथील कमाल दर हा ६ हजार रूपयांचा होता. पण या बाजार समितीमध्ये आज केवळ ४ क्विंटल टोमॅटोची (Tomato) आवक झाली होती. तर पाटन बाजार समितीमध्ये १ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. उर्वरित बाजार समित्यांमध्ये २ हजार रूपये ते ४ हजार रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. 

(Todays Tomato Market Rates)

 

आजचे सविस्तर टोमॅटोचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/06/2024
कोल्हापूर---क्विंटल293100040002500
पुणे-मांजरी---क्विंटल494360054004500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल61440055004750
पाटन---क्विंटल9150020001750
विटा---क्विंटल40200030002750
राहता---क्विंटल20100035002300
पंढरपूरहायब्रीडक्विंटल1750040002500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15453050004850
अकलुजलोकलक्विंटल18300045004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल159220028002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10300035003250
पुणे-मोशीलोकलक्विंटल315300040003500
पेनलोकलक्विंटल132440046004400
वाईलोकलक्विंटल60200040003000
मंगळवेढालोकलक्विंटल92100040003200
कामठीलोकलक्विंटल18450055005000
हिंगणालोकलक्विंटल26300040003500
पनवेलनं. १क्विंटल737400045004250
सोलापूरवैशालीक्विंटल35450040002000
जळगाववैशालीक्विंटल80300055004200
कराडवैशालीक्विंटल138150020002000
भुसावळवैशालीक्विंटल4500060005500
टॅग्स :टोमॅटोबाजारमार्केट यार्ड