सांगलीच्या प्रसिद्ध हळदीची भुरळ आता रशिया आणि जपानलाही पडली आहे. तेथील व्यापारी मंगळवारी थेट सांगलीबाजार समितीत दाखल झाले. येथील वसंतदादा मार्केट यार्डातील हळद सौद्यांना जपान व रशियातील मास्को येथील व्यापाऱ्यांनी बाजार समितीला भेट दिली.
हळदीचे सौदे, पॅकिंग, निवड प्रक्रिया, हळदीचे प्रकार यांची माहिती घेतली. सभापती सुजय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सांगलीतून रशियाला दरवर्षी सुमारे ५०० टन हळद निर्यात केली जाते.
यावर्षी आणखी जास्त हळद नेण्याचा रशियन व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते थेट बाजार समितीत दाखल झाले. मागील दोन महिन्यांपासून हळदीचा नवा हंगाम सुरू झाला आहे.
यंदा उत्पादन कमी झाल्याने दर वाढत आहेत. सांगलीसह कोल्हापूर, कर्नाटक सीमा भागातून हळद मोठ्या प्रमाणात येत आहे. यावेळी संचालक आनंदराव नलवडे, काडाप्पा वारद, प्रशांत पाटील, सचिव महेश चव्हाण, व्यापारी बाळू मर्दा, गोपाळ मर्दा आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: हळदीला मिळाली बारा वर्षांतील उच्चांकी दरवाढीची झळाळी