Join us

Tur Bajarbhav : तुरीचा दर चांगला पण आवक घटली! आज किती मिळाला बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:25 PM

Todays Tur Market rates राज्यभरातील तुरीला बाजार समित्यांमध्ये चांगला दर मिळत आहे. पण अनेक बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक होताना दिसत आहे.

Tur Latest Market rates : मागचा हंगाम तुरीच्या दरासाठी चांगला होता. अनेक भागांत दुष्काळ आणि पाणी टंचाई असल्यामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्याचाच फायदा तुरीला झाला असून सध्या तुरीचे दर १० हजार रूपये प्रतिक्विंटलच्या घरात आहेत. पण खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे सध्या तुरीच्या आवकेत घट झाल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज बाजारात गज्जर, लाल, पांढरा आणि लोकत तुरीच्या वाणाची आवक झाली होती. मलकापूर, हिंगणघाट, अमरावती आणि अकोला बाजार समित्यांमध्येच (Market Yard) सर्वांत जास्त तुरीची आवक झाली होती. अमरावती बाजार समितीमध्ये आज ६४६ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ही आवक आजच्या दिवसातील सर्वांत जास्त होती, तर या बाजार समितीमध्ये ११ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

आजच्या किमान आणि कमाल दराचा विचार केला तर औराज शहाजानी बाजार समितीमध्ये आज ८ क्विंटल तुरीची आवक झाली होती, आणि या बाजार समितीमध्ये ११ हजार ९५५ रूपये सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. अकोला बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर मिळाला असून १० हजार रूपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. तर या बाजार समितीमध्ये ५१५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

(Todays Latest Tur Market Rates)

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/06/2024
भोकर---क्विंटल3103001050510402
हिंगोलीगज्जरक्विंटल110106001130010950
मुरुमगज्जरक्विंटल1107001070010700
अकोलालालक्विंटल51570001225010000
अमरावतीलालक्विंटल646116001200011800
धुळेलालक्विंटल3920092009200
मालेगावलालक्विंटल360001070010500
नागपूरलालक्विंटल255100001165111238
हिंगणघाटलालक्विंटल43289001210510400
वाशीम - अनसींगलालक्विंटल60100001150011000
अमळनेरलालक्विंटल3101001020010200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल35113401156011450
मलकापूरलालक्विंटल613100001206011750
सावनेरलालक्विंटल47112571152311420
चाकूरलालक्विंटल1105001050010500
औराद शहाजानीलालक्विंटल10107001185111275
उमरगालालक्विंटल3100011100010001
नेर परसोपंतलालक्विंटल2109001135011125
सिंदी(सेलू)लालक्विंटल37105001120011000
दुधणीलालक्विंटल10115801180011700
अहमहपूरलोकलक्विंटल2775001165110441
जालनापांढराक्विंटल13960001160010500
बीडपांढराक्विंटल9114401144011440
गेवराईपांढराक्विंटल2113201145011350
औराद शहाजानीपांढराक्विंटल8119001201111955
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरी