राज्यात तूरीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून क्विंटलमागे तूरीला चांगला भाव मिळत आहे. लाल, पांढऱ्या तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये ८५९५ क्विंटल आवक झाली.
अमरावतीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण १०,००० रुपये भाव मिळाला. लातूर बाजारसमितीत आज तूरीला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार ३७१ रुपये ते १० हजार ५३५ रुपयांच्या दरम्यान भाव आहेत.
नागपूर बाजारसमितीतही तूरीला आज चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार १२४ रुपये भाव सुरु आहे. मागील आठवड्यापासून तूरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे मोठा कल दिसून येत आहे.
आज दिनांक १४ मार्च रोजी तूरीला सकाळच्या सत्रात मिळालेला दर कसा होता? जाणून घ्या.
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
14/03/2024 | ||||
अमरावती | 5455 | 9700 | 10300 | 10000 |
बीड | 35 | 9101 | 9850 | 9500 |
छत्रपती संभाजीनगर | 30 | 7810 | 9349 | 9000 |
छत्रपती संभाजीनगर | 37 | 7000 | 9812 | 8406 |
जळगाव | 2 | 8800 | 8800 | 8800 |
लातूर | 150 | 10211 | 10535 | 10371 |
नागपूर | 2830 | 9000 | 10499 | 10124 |
सोलापूर | 56 | 9300 | 10000 | 9700 |