Lokmat Agro >बाजारहाट > Tur Kharedi : यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tur Kharedi : यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tur Kharedi: Know the reason behind turning away from Tur purchasing center this year in detail | Tur Kharedi : यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tur Kharedi : यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Tur Kharedi : खुल्या बाजारात शेतमालाचे दर घसरल्यास शेतकऱ्यांसाठी हमी केंद्रांना आधार मानले जाते. मात्र, यंदा तुरीचा हमी दर आणि खुल्या बाजारातील दर यात केवळ तफावत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजाराकडे वळताना दिसत आहेत. (Tur Kharedi)

Tur Kharedi : खुल्या बाजारात शेतमालाचे दर घसरल्यास शेतकऱ्यांसाठी हमी केंद्रांना आधार मानले जाते. मात्र, यंदा तुरीचा हमी दर आणि खुल्या बाजारातील दर यात केवळ तफावत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजाराकडे वळताना दिसत आहेत. (Tur Kharedi)

शेअर :

Join us
Join usNext

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : खुल्या बाजारात शेतमालाचे दर घसरल्यास शेतकऱ्यांसाठी हमी केंद्रांना आधार मानले जाते. मात्र, यंदा तुरीचा हमी दर आणि खुल्या बाजारातील दर यात केवळ दोनशे रुपयांची तफावत आहे. (Tur Kharedi)

यंदा शासकीय खरेदी केंद्रांना २ लाख टन  तूर खरेदी करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. परंतु, नाफेडकडून खरेदी झालेल्या शेतमालाचे चुकारे उशिरा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर्त हमी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. (Tur Kharedi)

राज्यभरात १२ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. आंतर पीक म्हणून शेतकऱ्यांनी तुरीला पहिली पसंती दिली. परंतु, तुरीचे दर पडले. यातून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. (Tur Kharedi)

गेल्या वर्षी क्विंटलला ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता, तर यंदा तो साडेसात हजारांच्या घरात आला आहे. यावर्षी १२ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यातून दहा लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज मांडला गेला. प्रत्यक्षात तुरीचा उत्पादन खर्च वाढला असताना, दर पडल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. (Tur Kharedi)

२०० रुपयांची तफावत

हमी केंद्रावर तुरीला ७ हजार ५५० रुपये क्विंटल, तर खुल्या बाजारात ७ हजार ३०० रुपये दर आहे. यामध्ये केवळ २०० रुपयांची तफावत आहे. याशिवाय तूर खरेदी चाळणी करून केली जाते. यामुळे इतर शेतमाल शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागतो. त्या तुलनेत २०० रुपये कमी असले, तरी संपूर्ण शेतमाल खुल्या बाजारात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.

२५,००० शेतकऱ्यांच्या नोंदी

राज्यभरात विविध केंद्रांवर २५ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांनी केंद्रांवर तूर आणलेली नाही.

तुरीचे दर वाढण्याची प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना आहे. शेतमाल आणण्यासाठी मेसेज केल्यावरही न आलेल्या शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला. अनेकांनी दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याचे पत्र आलेले नाही. - राजेश मॅडमवार, व्यवस्थापक खरेदी विक्री संघ, यवतमाळ

हे ही वाचा सविस्तर :  CCI In High Court: यावर्षी किती कापूस खरेदी केला, किती नाकारला? उच्च न्यायालयाची कापूस महामंडळाला विचारणा

Web Title: Tur Kharedi: Know the reason behind turning away from Tur purchasing center this year in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.