Join us

Tur Market : बाजारात तूरी घेत आहेत भरारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 2:35 PM

Tur Market : बाजारात सध्या तूरीला चांगला दर  मिळत आहेत. काय आहेत तूरीचे बाजारभाव? 

Tur Market : 

सुनील काकडे : 

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ५८२  क्विंटल इतकी तूरीची आवक झाली. त्याला सर्वसाधारण भाव हा १० हजार ८७० रूपये मिळाला. हा दर अमरावती कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये सार्वधिक दर होता. त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यातील कारंजा, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्येही चांगला दर मिळत असून, बीडच्या बाजार समितीत सर्वात कमी दर मिळाला. शेतकऱ्यांना दैनंदिन हवामानाची स्थिती, पीक पेरणी सल्ला, कृषिमालाच्या बाजार भावाची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळाकडून राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला नेमका किती दर मिळतोय, यासंबंधीची माहिती मिळते. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला दर सर्वाधिक मिळाला.

वाशिमचा माल जातोय कारंजा, अमरावतीतकारंजा, अमरावतीच्या तुलनेत अन्य ठिकाणी तुरीला कमी दर मिळत आहे. त्यामुळे बाजारभाव तपासून शेतकरी त्यांचा माल घेऊन कारंजा, अमरावतीच्या बाजार समितीमध्ये जात असल्याचे दिसत आहे.यासह विदर्भातील कारंजात १० हजार ७००, मेहकरात १० हजार ७५०, नागपूर येथे १० हजार ४००, अकोला १० हजार, यवतमाळ ९ हजार ९२७, वाशिम बाजार समितीमध्ये ९ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड