Join us

Tur market Maharashtra: विदर्भात लाल तूरीला आज सर्वाधिक, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 13, 2024 4:08 PM

क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव...

राज्यात आज तूरीची ५५१७ क्विंटलची आवक होत असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत क्विंटलमागे तूरीला १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. आज राज्यात लाल तूरीसह, पांढऱ्या व गज्जर तूरीची आवक झाली.

विदर्भात लाल तूरीला आज सर्वाधिक भाव मिळत असून अमरावती बाजारसमितीत १७०७ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना ११६७५ रुपयांचा भाव मिळाला. तर वाशिम बाजारसमितीत १३५० क्विंटल लाल तूरीची तर ७०० क्विंटल स्थानिक तूरीची आवक होती. दरम्यान शेतकऱ्यांना ११६७५ रुपयांचा भाव मिळत आहे.

हिंगोलीत आज गज्जर, लाल तूरीची आवक झाली. ११३५० ते ११४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

धाराशिवच्या लाल तुरीला इतर बाजारसमितींच्या तुलनेत सर्वाधिक बाजारभाव मिळाला. आज अकोला व वाशिम, वर्ध्यात सर्वाधिक तूरीची आवक झाली. धाराशिवमध्ये आज गज्जर तुरीला १० हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

तूरीला काय मिळतोय बाजारभाव? 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/06/2024
अहमदनगरपांढरा459000100009000
अकोलालाल89796001217511253
अमरावतीलाल1707115001185011675
बुलढाणालाल30298501160010800
धाराशिवगज्जर13105001090010700
धुळेलाल39900101009985
हिंगोलीलाल54110001170011350
हिंगोलीगज्जर90110001180011400
नागपूरलोकल40102401120010800
नागपूरलाल86110001154811400
नाशिकलाल392251101110500
परभणीलाल70112011132811251
परभणीपांढरा585001020010000
सोलापूरलाल152100001212511000
वाशिम---700100001210011675
वाशिमलाल1350105751160011000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5517

टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड