Join us

Tur Market: तूरीचे दर स्थिरावले, दर आले प्रतिक्विंटल इतक्या रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 1:29 PM

सोयाबीनचे दर वाढेनातः शेतकऱ्यांना हवेत बियाण्यांसाठी पैसे, बाजारात आवक वाढली

बाजारात तुरीचे दर सरासरी प्रतिक्विंटल १०.७९५ रुपयांवर स्थिरावले आहेत. सोयाबीन, हरभऱ्याचे दर कमी असल्याने यामध्ये उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनचे दर सरासरी प्रतिक्विंटल ४,२९० रुपये असून हरभराही सरासरी ६ हजार रुपयांवर स्थिरावला आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढल्याने बाजारात आवक वाढली आहे.

गतवर्षी उशिरा पेरणी झाली. यामले उत्पादनावर परिणाम याला परिणामी उत्पादन घटले. सोयाबीन, कापूस उत्पादनावर परिणाम झाला. सोयाबीनचा उतारा काही ठिकाणी हेक्टरी तीन ते चार क्विंटलच्यावर गेला नाटी त्यातत्त सोयाबीन काढणीपासून दर गडगडल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात विक्री करावी लागली.

आता बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने अकोला बाजार समितीमध्ये सरासरी २२९0 क्विंटल सोयाबीनची आवक सुरू आहे. परंतु, दर बघितल्यास कमीत कमी प्रतिक्विंटल ३,९०० रुपये असून, सरासरी ४,२६२ रुपये एवढे असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

हरभऱ्याचे भाव सहा हजारांवर

यावर्षी बाजारात नवीन हरभरा आला तेव्हापासून हरभरा पिकाला अपेक्षित दर मिळाले नव्हते. आता प्रतिक्चिटल सरासरी ६००० रुपये वाढले आहेत. कमीत कमी ५,१०० रुपये दर आहेत.

गहू आला बाजारात

अकोला बाजार समितीत लोकल गहू दररोज सरासरी ५५ क्विंटल आवक असून, दर मात्र सरासरी प्रतिविचेटल २,५०० रुपये असून, कमीत कमी २००० रुपये एवढा आहे.

तुरीचे दर स्थिरावले

तुरीचे दर प्रतिक्विंटल सरासरी १०,७९५ रुपये असून, कमीत कमी दर ९००० हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. जास्तीत जास्त दर १२,४४० रुपये आहेत. परंतु, या पिकालाही पावसाचा फटका बसल्याने तुरीला अपेक्षित दर मिळणे कठीण झाले आहे. सध्या बाजार भाव स्थिर आहेत.

टॅग्स :तूरबाजारअकोला