Join us

तुरीच्या भावाचा ११ हजाराचा उच्चांक

By बिभिषण बागल | Published: August 06, 2023 10:14 AM

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून वेळेवर न आल्यामुळे खरीप पेरण्या झाल्या नाहीत खरिपातील कडधान्य पेरण्याची मुदत संपल्यामुळे भविष्यातही तूर, मूग, मटकी, उडिदाचे दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

सांगली तुरीचा भाव आता विक्रमी पातळीकडे वाटचाल करत आहे. तुरीच्या दरातील तेजी वाढत आहे. दर वाढत असले तरी बाजारातील आवक कमीच आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने सरकारचा दबाव असूनही दरपातळी वाढत गेली. सांगलीमार्केट यार्डात शनिवारी निघालेल्या सौद्यात तुरीच्या भावाने ११ हजार रुपयांचा टप्पा पार केला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून वेळेवर न आल्यामुळे खरीप पेरण्या झाल्या नाहीत खरिपातील कडधान्य पेरण्याची मुदत संपल्यामुळे भविष्यातही तूर, मूग, मटकी, उडिदाचे दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. पण पुरवठाच कमी असल्याने या प्रयत्नांना यश आले नाही. शनिवारी सांगलीत निघालेल्या सौद्यामध्ये तुरीला प्रति क्विंटल १० ते ११ हजार रुपये दर मिळाला आहे.

उत्पादन घटल्याने दरावर झाला परिणामखरीप हंगामातील कडधान्य पेरणीचे राज्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. सांगली जिल्ह्यात केवळ १० ते १५ टक्केच पेरणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर तुरीसह सर्वच कडधान्यांचे दर तेजीतच असणार आहेत. सध्या तुरीला प्रति क्विंटल १० ते १२ हजारांपर्यंत दर मिळत आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :मार्केट यार्डबाजारसांगलीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती